आठवणी तुझ्या ,
धुवादार पावसासारख्या ...!
अचानक गडगडूनतनमनास भिजविणार्या ...!
पाउस गार वार्यांसह
अंग अंग शहारतो ...!
aaus नयनांतून आठवांसह
घळ घळा ओघळतो ...!
दोघेही नकळत
एकांती गाठतात ...!
भान जगाचे
विसरावयास लावतात ...!
कसाही असो मला
पावसाळा खुप आवडतो ...!
सरी वर सरी कोसळताना
आठवांत तुझ्या मोहरून
--- संजय कुलकर्णी .

No comments:
Post a Comment