Popular Posts

Tuesday, June 21, 2011

नातं ...अनामिक !




नातं तस जीवनात

कुणाशीही होत असतं ,

पण एखादं नातं

मनात जपलेलं असतं !


सांगता न येतं

जे कुठल्याही शब्दात ,

अडकवता न येतं

ते कुठल्याही बंधनात !


ते असतं केवळ

एक स्वैर मनस्वी ,

अन जोडलेलं असतं

फक्त ह्रुदयाचं ह्रुदयाशी !


डोकावले जरी नकळत

कितीही त्याच्या अंतरंगात ,

तरीही ना उमजत

गहिरेपण नात्याचे जीवनात !


कदाचित समाजाच्या रूढींत

न बसणारं असतं ,

(पण) खास रुजणार मनात

हवंहवंसं वाटणारं असतं !


कदाचित जगाच्या दृष्टीन

असतं क्षुल्लक, कवडीमोल ,

(पण) त्या दोघांच्या दृष्टीन

मात्र एकमेव अनमोल !


असतं ते अंतर्मनात

लपून घर करणारं ,

कधी उदास असताना

आठवणींतून मन रिझविणारं !


जणु बेरंगी जीवनात

हजारो रंग उधळणार ,

खरया अर्थाने जगविणारं

अनोखे अनामिक नातं ...!

---संजय कुलकर्णी.

2 comments: