Popular Posts

Thursday, June 2, 2011

प्रेम द्यावे, प्रेमात जगावे ...!




प्रेम द्यावे, प्रेमात जगावे ;

ना अपेक्षावे, ना रुसावे !

हात देता कुणी प्रेमाने ,

घट्ट तयास धरून ठेवावे !


हक्क ना अपुला मातीवर ,

हक्क ना कधी पाण्यावर !

हक्क ना कुणाचा निसर्गावर ,

जगावे पाहुण्या प्रमाणे आयुष्यभर !


स्वच्छंद उडणार्या फुलपाखरासम असावे ,

झरझर वाहणार्या नदीसम असावे !

स्वत:हून वर्षले कुणी प्रेम तुम्हांवर ,

नाचावे बेधुंदपणे भिजून प्रेम-वर्षावात अनावर !


चेहरा पाडुनी ना रहावे क्षणभर ,

बोलते राहुनी मनमोकळे करावे निरंतर !

शोधावे आनंदास हरेक अनुभवात सर्वांबरोबर ,

शब्द सुचता गावे गीतातून हर्षविभोर ...!


---संजय कुलकर्णी .

No comments:

Post a Comment