प्रेम सुमधुर स्वर असतो,
प्रेमिकांनी आनंदाने छेडायचा असतो !
तालात एकमेकांच्या गायचा असतो
जीवनात सुंदर गुंफायचा असतो ...!
प्रेम म्हणजे गाणं असतं,
मनस्वी भावनांच लेणं असतं !
एकसुरात दोघांनी गायचं असतं,
एकदिलान तल्लीन व्हायचं असतं ...!
स्वप्न्सुरात प्रेम-पहाट जागायची असते
द्वंद्व-गीतात दिनभर अनुभवायची असते !
स्वर-संध्या एकत्र फिरायची असते
शृंगाररसात प्रेम-मैफिल बहरायची असते !
प्रेमात स्वत:स विसरायचं असतं
प्रेमात सरस्व अर्पायचं असतं !
प्रेमात जीवन फुलवायचं असतं
प्रेमात स्वप्नांना साकारायच असतं ...!
---संजय कुलकर्णी.

No comments:
Post a Comment