Popular Posts

Saturday, June 4, 2011

तळमळ खर्या मित्राची ....




अगदी खरं अन मनातलं सारं सांगायच आहे ,

वाटत आहे असेच तरी गप्प तू बसली आहे !

नेहमी प्रमाणे स्त्री-सुलभ ' मान ' अडवतो आहे ,

चल, शेवटी लहान होऊन मीच माघार घेतो आहे !


स्वार्थ नाही माझा कठोर बोलण्यात ,

सखये हे तुला कधी समजायचे ?

खोट्या फसव्या स्तुती-सुमनांच्या मोह जाळात ,

प्रिये तू स्वत:हून का अडकायचे ?


वागलीस कशीही तरी सांग गप्प कसे मी रहायचे ,

काळजीने तुझ्या दिनरात मी का तळमळायचे ?

जीव गुंतला तुझ्यात तर का असे भांडायचे ,

रुसल्यावर तू , पुन्हा पुन्हा किती मनवायचे ?


भेटतील तुला माझ्याहून कितीतरी गोड गोड बोलणारे ,

नादी लावून प्रलोभनांनी सत्यापासून दूर भरकटविणारे !

लांब इतकी जावू नकोस कि मार्ग परतीचा विसरशील ,

मोल खऱ्या मित्राचे वेळ निघून गेल्यावर जाणशील !


---संजय कुलकर्णी .


No comments:

Post a Comment