Popular Posts

Saturday, April 14, 2012

एकरुपवून रात्र गेली ..!!


एकरुपवून रात्र गेली ..!!



उधळून सर्वस्व रे, मिळवून रात्र गेली,
पेटवून उन्मत्त वणवा, शांतवून रात्र गेली .



लपंडाव चाले रे रोज, तुझ्या भावनांशी ,
गाठून एकांती मला रे, खेळवून रात्र गेली.



तू सांग कसे टाळू मी ? मदधुंद आरक्त मानसी
असे डाव तू खेळले, दमवून रात्र गेली.



जाणीव मजला न्हवती मुळीच, चंद्र चांदण्यांची
निजवून चंद्रास मम कुशीत, चांदणी होऊन गेली .



गोडी इतुकी लागली रे, मज काहीच कळेना
अतृप्त अधुरी तुझ्याविना मी, दाखवून रात्र गेली.



गेले उमजून तेव्हा, भेदभाव अपुल्यात नाही
हसतोस अता कसा रे ? एकरुपवून रात्र गेली ..!!


--- संजय कुलकर्णी .

No comments:

Post a Comment