
तुझी आठवण ....
नेहमीची शांत हि दुपार
असाच एकाकी मी घरी ,
नेहमीचाच उदास हा प्रहर
तशात आठवावी तू खरी ..!!
का बोलावलेस तुझ्या घरी ?
माहिती असुनी तू पुसशी ,
वेड लावून मला छळायची
सवय तुझी ठाऊक मजशी ..!!
जवळ घेता लटके ढकलशी
जेवलो, हवे मज मुखशुद्धी ,
म्हणताच तू लाजून हळूचशी
चुंबूनी मजला धूम ठोकशी ..!!
तुझ्या संसारी तू गढलेली
व्यापात तुझ्या तू गुंतलेली ,
विसरली असशील प्रेम, घटना घडलेली
आठवली मजला जणु आताच भेटलेली ..!!
-- संजय कुलकर्णी.
No comments:
Post a Comment