Popular Posts

Saturday, April 14, 2012

भांडणे ...


भांडणे ...



नजर तुझी माझी
कधी ना जुळायची ,

पण चोरून पाहण्याची
संधी ना सोडायची ..!!



इच्छा असुनी कधी
ओळख ना वाढवायची ,

सुरवात कुणी करायची
ह्याचीच वाट पहायची ..!!



समोरा समोर येता
सलगी ना दाखवायची ,

इतरांमध्ये मात्र चर्चा
सतत एकमेकांची करायची !



मते तुझी माझी
कधी ना जुळायची ,

पण वाद घालण्याची
प्रथा ना मोडायची ..!!



अंतरी सल असुनी
स्पर्धा आनंदी दाखविण्याची ,

मनांतरी गरज असुनी
इर्षा श्रेष्ठत्व गाजविण्याची ..!!



काळजी दोघांस लागली
कोंडी कधी कशी सुटावी ?

कुजबुज जनात माजली
लुटुपुटूची प्रेमाची भांडणे असावी ..!!



--- संजय कुलकर्णी.

No comments:

Post a Comment