Popular Posts

Saturday, April 14, 2012

रंग भरल्या खेळातून ...


रंग भरल्या खेळातून ...



काढून हात गळ्यातून
हाय .. असा वळू नकोस ,

रंग भरल्या खेळातून
हाय .. असा पळू नकोस ..!



अजून मम श्वासांनी
गंध तुझे भरू दे ,

अजून तव स्पर्षांनी
धुंद मला होऊ दे ..!



अजून ह्या ओठांनी
मधुकंद बेफाम लुटू दे ,

अजून ह्या बाहूत
मदमस्त बेताब घुसू दे ..!



अजून अंगांग माझे
खेळात रांगड्या फुलू दे ,

शरीर मदांध तुझे
झोकात धसमुसळ्या झुलू दे ..!



संधी अपुली एकरूपतेची
हाय ... प्राणसजणा गमवू नकोस ,

धुंदी डोळ्यातली मधुमिलनाची
हाय ... मनमोहना घालवू नकोस ...!!


--- संजय कुलकर्णी .

No comments:

Post a Comment