
नव्याने इतिहास घडविणार कोण ...?
'अन्याय अन्याय' म्हणून जो तो ओरडतो ,
न्यायाने इथे वागतंय कोण ?
विश्वासभंगाने जो तो गळे काढतोय,
विश्वासाने साथ इथे देताय कोण ?
इतिहासात सदोदित जो तो रमतो ,
नव्याने इतिहास घडविणार कोण ...?
सुरुवात करण्याचे जो तो बोलतो,
स्वत:हून पुढाकार घेणार कोण ?
लाचारीत कुणाच्या तरी धन्य व्हायचे,
सत्व स्वत:चे इथे जपतोय कोण ?
खुशमस्कर्यांत मशगुल जो तो नेता,
हालांस जनतेच्या पहातंय कोण ?
कायदा बनविण्या आधी पळवाटा शोधतात,
भीती कायद्याची बाळगतय कोण ?
तुरुंगातही गुंड दहशतवादी,घोटाळेबाजांस "विशेष दर्जा",
सामांन्यांस इथे पुसतंय कोण ?
आत्महत्ये नंतर कर्जमुक्ती घोषित होते,
मोल कष्टकर्यांचे जाणतय कोण ?
मृतांच्या नावानेही इथे फायदे लुटतात,
जिवंत माणसास विचारताय कोण ?
विनाश वसुंधरेचा जवळ आला म्हणत
हिरीरीने टाहो फोडतो कोण ?
कोन्क्रीतचे जंगल सर्वत्र बनविले तर
निसर्गाचा प्रकोप थांबविणार कोण ?
--- संजय कुलकर्णी.
No comments:
Post a Comment