जीवन ...
स्वप्नांचा फुलोरा आहे
सत्याचा मात्र कटोरा आहे ..!
आनंदाचा मागोवा आहे
दु:ख्खांचा सतत ससेमिरा आहे ..!
जगण्याच्या ह्या धडपडीला
उपेक्षांचा निरंतर पाठपुरावा आहे ..!
जीवनास समझून घे
संधींचा इथे दुष्काळ आहे ..!
थोडी मस्ती विरंगुळ्यासाठी
कष्टांचा जगी बोलबाला आहे ..!
घटका भरता काळ ना पाहे
तू तृप्त आहे कि भुकेला आहे ..!
आकांक्षांच्या पूर्ततेसाठी पुन्हा
जन्म मरणाचा फेरा आहे ..!!
--- संजय कुलकर्णी .
No comments:
Post a Comment