Popular Posts

Saturday, July 7, 2012

सय तुझी सजणा ...

भान दिन रातीचे मला न उरते, 
सय तुझी सजणा मना सैरभैर करते !

सारे काही असुनी जीवन भकास वाटते,
सय तुझी सजणा मना सैरभैर करते ...!!



राम प्रहरी गीत कसे विरहाचे सुचते,
सय तुझी सजणा मना सैरभैर करते !

कामात नेहमीच्याच कशी पदोपदी मी चुकते
सय तुझी सजणा मना सैरभैर करते ...!!



भासांनी तुझ्या अशी क्षणोक्षणी मी फसते,
सय तुझी सजणा मना सैरभैर करते !

दर्पणी बघुनी तुला घायाळ लाजुनी हसते,
सय तुझी सजणा मना सैरभैर करते ...!!



स्पर्शगंधाने तुझ्या तनमनी भारुनी मी जगते,
सय तुझी सजणा मना सैरभैर करते !

वाटेवरी तुझ्या डोळे लावून मी बसते,
सय तुझी सजणा मना सैरभैर करते ...!!


-- संजय कुलकर्णी .

No comments:

Post a Comment