Popular Posts

Saturday, July 7, 2012

ज्वालामुखी  ... 

ती कोणती नदी होती ? तो कसा सागर होता ?
जो किनारा पाहिला मी तो किनारा कोरडा होता ..!!


हा कसा मला भास सुखाचा जाहला ?
मी पाहिलेला केवळ आभास मृगजळाचा होता ..!!


सादले जयांनी मला ते आवाज ओळखीचे होते ..
हा मैत्रीचा बंध होता ! तो प्रीतीचा स्नेहबंध होता ..!!


ह्या हितचिंतकांनी दाखविले आज रूप खरे तयांचे
ज्यांच्यासाठी लावली होती मी दिनरात डोळ्यांपुढे झापडे ..!!


भल्यासाठी माझ्या ठोकरले तयांनी आदराने
हासले माझ्या माघारी केव्हढे उपकार तयांचे ..!!


लागला आहे अताशा छंद प्रेम उधळण्याचा त्यांना
एरवी, त्यांच्या भावनेचा आतबट्ट्याचा व्यवहार होता ..!!


लुटले मज जवळचे त्यांनी होते न्हवते जे काही
मी ना बोभाटा केला ... लुटणारयांवर जीव जडला होता ..!!






---संजय कुलकर्णी .
  

No comments:

Post a Comment