Popular Posts

Saturday, July 7, 2012

हे ठावे तुलाही अन मनोमन मलाही ...!!




तू कबूल करो 
वा मी नाकारो 

पण एकमेकां शिवाय 
मन लागत नाही 

हे ठावे तुलाही 
अन मनोमन मलाही ।। १ ।।


डोळे सुद्धा अपुले
बोलति मनाने मनाशी

सर्व काही सांगती
पण कोणी ना ऐकती

हे ठावे तुलाही
अन मनोमन मलाही ।। २ ।।


ना तुझ्याजवळ मी
ना मजपाशी तू

दूर एकमेकांपासून तरी
सूर एक अंतरी !

हे ठावे तुलाही
अन मनोमन मलाही ।। ३ ।।


प्रेम तुझे मजवर
अन माझे तुजवर

जाणतेस खरे तुही
अन मानतो मीही !

हे ठावे तुलाही
अन मनोमन मलाही ।। ४ ।।


--- संजय कुलकर्णी 

No comments:

Post a Comment