Popular Posts

Saturday, July 7, 2012

सवय आहे मला ... 


सवय आहे मला 
तुझी वाट पहाण्याची, 
उशिरा येऊन लवकर 
निघण्यासाठी तगादा लावण्याची ..!!


सवय आहे मला
तुझी बडबड ऐकण्याची,
स्वत:बद्दल बोलायचे सोडून
जगाची उठाठेव सांगण्याची ..!!


सवय आहे मला
एकांती तुला आठवण्याची,
सहवासातील मधुर क्षण
अंतरी वारंवार अनुभवण्याची ..!!


सवय आहे मला
तुझे मिसकॉल देण्याची,
माझा 'Talk-Time' संपवून
तासंतास 'Time-pass' करण्याची ..!!


सवय आहे मला
तुझे ' प्रेम नाही ' सांगण्याची,
रागावून मी रुसतां
प्रेमाने तुझ्या मनवण्याची ..!!


--- संजय कुलकर्णी.

No comments:

Post a Comment