Popular Posts

Saturday, July 7, 2012


स्वर्ग पाहिला होता ..!!


हरपून भान चार क्षण जीव सुखावला होता
सहवासात तुझ्या साजणे मी स्वर्ग पाहिला होता ..।। धृ ।।


वैशाख वणवा अपयशांचा सर्वत्र रणरणता पेटला होता
त्राही त्राही होऊन गलीतगात्र जीव गांजला होता

सुखावून स्वप्नांच्या चार सरी मनी बरसल्या होत्या
सहवासात तुझ्या साजणे मी स्वर्ग पाहिला होता ..।। १ ।।



विसरून व्यथांस जरा कुठे मी रमलो होतो
निरखून सुखांस जरा कुठे मी हसलो होतो

भुलवून स्वप्नात अचानक नियतीने डाव साधला होता
सहवासात तुझ्या साजणे मी स्वर्ग पाहिला होता ..।। २ ।।



कुठून कसा पवन गतस्मृतींचा हळुवार झुळकला होता
कुठून कसा पदर गुपितांचा अलवार सरकला होता

आठवांत तुझ्या सहज स्पर्षंबंधांचा मधुशार शहारला होता
सहवासात तुझ्या साजणे मी स्वर्ग पाहिला होता ..।। ३ ।।



हरपून भान चार क्षण जीव सुखावला होता
सहवासात तुझ्या साजणे मी स्वर्ग पाहिला होता ..।। धृ ।।


-- संजय कुलकर्णी .
 

No comments:

Post a Comment