Popular Posts

Saturday, July 7, 2012


थेंब ... पावसाचा !!

पावसाचा प्रत्येक थेंब
आस जगण्याची लावतो ,
अन बरंच काही
प्रत्येकाला नकळत सांगून जातो ..


तापलेल्या अन तहानलेल्या
व्याकूळ धरेवर पडतो ,
अन गंध मातीचा
आसमंती धुंद दरवळून जातो ..


अस्तित्व स्वत:चे संपवितो
सर्वत्र जीवन फुलवितो ,
अन विरताना प्रत्येकास
आनंद देण्यातला शिकवून जातो ..


आरक्त गालावरून ओघळतो
हळुवार ओझरता स्पर्शतो ,
निथळणार्या प्रत्येक थेंबांनी
अंतरी अनामिक ओढ लावतो ....!!


---- संजय कुलकर्णी .
 

No comments:

Post a Comment