Popular Posts

Saturday, July 7, 2012


तुझी माझी प्रीत ..!!

शब्दा वाचून तुला समजाव्या
अव्यक्त मम हृदयीच्या भावना,

बोलल्या वाचून मला उमजाव्या
अतृप्त तव अंतरीच्या कामना ..!!



तुला पाहता मी वाटावे
मला निरखता तू भासावे,

माझ्या ध्यासांत तू रहावे
तुझ्या आशांत मी वसावे ..!!



तुझ्या सुखास्तव मी झटावे
माझ्या आनंदास्तव तू नटावे,

तुझ्या श्वासांत मी जगावे
माझ्या जगण्यात तू आश्वसावे ..!!



एकरंग दो जीवने व्हावी
एकरूप दो तन्मने न्हावी,

प्रीत अपुली अद्वितीय असावी
मृत्यूसहि हरवून जन्मोजन्मी जुळावी ..!!


--- संजय कुलकर्णी.
 

No comments:

Post a Comment