Popular Posts

Saturday, July 7, 2012


प्रवास एका मैत्रीचा ... 

प्रवास एका मैत्रीचा
तुझ्या माझ्या सहवासाचा
उत्कट उत्स्फूर्त प्रेमाचा
अतूट आंतरिक बंधनाचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
अलगद हलक्या सरींचा
अबोल भाव जाणण्याचा
अंतरी मनस्वी समजण्याचा ... !


प्रवास एका मैत्रीचा
टपटप पडणार्या गारांचा
सुखात आनंदे गाण्याचा
दु:ख्खात एकत्र साह्ण्याचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
पहाटेच्या उबदार गारठ्याचा
हळूवार मनात शिरण्याचा
गुपचूप हृदयी वसण्याचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
तृषार्त तप्त उन्हाळ्याचा
कठीण असहाय्य प्रसंगात
खंबीर साथ देण्याचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
अपयशात उमेद जगविण्याचा
यशात तोल संभाळण्याचा
क्षणोक्षणी एकमेकांस घडविण्याचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
प्रेमाच्या अनोख्या नात्याचा
सारी बंधने झुगारण्याचा
साथ जीवनभर राहण्याचा ...!


---संजय कुलकर्णी.
 

No comments:

Post a Comment