Popular Posts

Saturday, July 7, 2012


खरंच, मी स्वप्नात तर नाही ना ? 

मम जीवनात तुझे असे येणे,
अन पाहता क्षणी प्रेमात पडणे,
हा केवळ आभास तर नाही ना ?
खरंच, मी स्वप्नात तर नाही ना ? ।। धृ ।।


संकटे, निराशा आणि उपेक्षा
आजवर ह्यांचाच होता प्रवास,
माझ्या जीवनात तुझ्या येण्याने
लाभला प्रेमळ हवा-हवासा सहवास ।। १ ।।

हा केवळ आभास तर नाही ना ?
खरंच, मी स्वप्नात तर नाही ना ? ।। धृ ।।


प्रेम, सुख, आनंद सदैव कल्पना विस्तार
एकला चलो रे हाच जगण्याचा प्रकार,
भेटुनी तुला जीवन जाहले एक स्व्प्नाविष्कार
अन जडला कायमचा मज अनोखा प्रेमविकार ..! ।।२ ।।

हा केवळ आभास तर नाही ना ?
खरंच, मी स्वप्नात तर नाही ना ? ।। धृ ।।


स्वत:भोवती विणलेल्या कोशात मी असतां रममाण
आश्वासून आजन्म साथीस तू ओतलेस प्रेम-पंचप्राण,
आळवून भावूक सादेने तू छेडलेस सुप्त संसार-गान
एकदा हारलेल्या दुर्भागीनीस तू दिधलेस जीवन-दान ! ।। ३ ।।

हा केवळ आभास तर नाही ना ?
खरंच, मी स्वप्नात तर नाही ना ? ।। धृ ।।


--- संजय कुलकर्णी .
 

No comments:

Post a Comment