Popular Posts

Saturday, July 7, 2012

पुन्हा कधी ...


कोणी दुखावले, कोणी चिडवले 
ह्याची कहाणी ... सांगेन पुन्हा कधी ,

कोणी फसवले, कोणी रडवले
ह्याची व्यथा .. सांगेन पुन्हा कधी ..!!


हृदय पिळवटणार्या अशा गोष्टी
लक्षात रहातात... विसरायच्या कशा कधी ?

आठवून दररोज रडायचे किती ?
अंत नाही ... हसेन पुन्हा कधी ..!!


जीवनभरच्या साथीच्या आणाभाका, वचने
काय नाही घडले ... आठवू किती ?

कोणी दिली, कोणी तोडली
कशा रीतीने ... सांगेन पुन्हा कधी ..!!


माणुसकीने वागणार्या सभ्य माणसांत
नकली शुभ चिंतक ... पाहू किती ?

तोंडावर हासून, पाठीमागून चिडवले
नकली चेहरे ... दाखवीन पुन्हा कधी ..!!

-- संजय कुलकर्णी .

No comments:

Post a Comment