
साथ जन्मभराची ...
भावनांस शब्दांच्या दाद दे
काव्य माझे वाचल्यावर ,
प्रेमास हृदयीच्या साद दे
मन माझे जाणल्यावर !
अंतरबाह्य मला समजून घे
मनात मला वसविल्यावर ,
साथ मला जन्मभराची दे
जोडीदार मला मानल्यावर ...!!
--- संजय .
















गर्दीत असलेला प्रत्येक जण एकटा आहे
सर्वांमध्ये रमणारा मनातून मात्र पोरका आहे ...!
सभोवताली सुंदर कागदी फुलांचा ताटवा आहे
नात्यांच्या फाफट पसार्यात प्रेमाचा दिखावा आहे ...!
कुणाला सांगायचे जो तो मागणारा आहे
चेहरा हसरा पण डोळे पाणावलेला आहे ...!
म्हणायला हे जीवन आनंदाचा मेळा आहे
हसत हसत दु:ख्खे भोगण्याचा सोहळा आहे ...!
जन्मापासून मरणापर्यंत सतत आकांक्षांचा पाठपुरावा आहे
आत्म्यास विसरून शाररीक आकर्षणाचा बोलबाला आहे ...!
---संजय कुलकर्णी .

त्या दिवशी संध्याकाळी
नेहमी प्रमाणे ती उशिरा आली ..!
आल्या आल्या म्हणाली कशी
लवकर जायचेय, थांबायला वेळ नाही ..!
ऐकून तिचे माझी सटकली
वेड लागले अन हिच्यावर लाईन मारली ..!
मीही चिडलो बराच बोललो
आलीस कशाला मग गेलीस उडत ..!
वागण्यावर तिच्या जाम वैतागलो
तोंडे फिरवून दोघेही बसलो धुसमुसत ..!
नाही येणार ती म्हणाली
जाण्याआधी एक 'वचन दे ' गुरगुरली ..!
थांबायला तुला वेळ नाही
अन द्यायला मजकडे राहिलेच नाही !
जास्त नको मला काही
साथ दे प्रेमाने जन्मभरा साठी !
पाहून तिच्या डोळ्यातील पाणी
पारा रागाचा माझाही खाली जाई ..!
दिलेले वचन मोडत नाही
प्रत्येक जन्मात तूच माझी राणी ..!
जवळ येऊन रडू लागली
तुझ्याशिवाय सखया माझे कुणी नाही ..!
निघताना एकत्र ...मनात आले
अरे, भेटण्याचे उद्दिष्ट सफल झाले ...!!
---संजय कुलकर्णी .

सांज जाहली, ओढ लागली पण
ती येणे अजून बाकी ,
खुप बोलली, लाजून हासली पण
मन कळणे अजून बाकी ..!
लग्न झाले, मुले झाली पण
प्रेम करणे अजून बाकी ,
दिन गेले, वय सरले पण
जीवन जगणे अजून बाकी ..!
लढे झाले, स्वातंत्र मिळाले पण
भरभराट होणे अजून बाकी ,
नेते जाहले, पक्ष निघाले पण
'जन-नेता' येणे अजून बाकी ..!
घोषणा गाजल्या, सत्ता मिळाल्या पण
वाली जनतेचा अजून बाकी ,
उपोषणे गाजली, आशा जागली पण
भ्रष्टाचार रयतेचा अजून बाकी ..!
शोध लागले, सुखसोयी आल्या पण
सुख लाभणे अजून बाकी ,
इंटरनेट आले, जग जवळी आले पण
मने दुरावणे अजून बाकी ....!!
---संजय कुलकर्णी .

शब्द गीतातील गुणगुणती सारे जण
पण भाव तयातील ना जाणती कोण ..!
कर्कश्य संगीताच्या ह्या जंजाळात
हरवले गीतातले मम मनीचे बोल ..!
युग युगांपासून लागली सगळ्यांस
अधिक मिळविण्याची न संपणारी ओढ ..!
नित्य नवे करती वैदन्यानिक शोध पण
हरविली मन:शांती न जाणे कुठे कोण ..!
आहे तयाचा एक अंश मी
वसतो माझ्यात जरी तो ..!
दिखाव्यात भ्रमलेल्या प्रत्येकास पण
कळेल कसे अन मानेल तरी कोण ...!!
---संजय कुलकर्णी .