
काही केल्या ...
काही माणसं ...
काही केल्या ...विसरता येत नाहीत ,
आठवणी त्यांच्या ...
काही केल्या ...आयुष्यातून जात नाहीत ..!!
काही संबंध ...
काही केल्या ...आपणास दुरावत नाही
जिव्हाळा त्यांचा
काही केल्या ...जीवनातून आटत नाही ...!!
काही व्यक्ती ...
काही केल्या ...आपणास समजत नाहीत ,
स्वभाव त्यांचे
काही केल्या ...काही उमजत नाहीत ...!!
काही नाती ...
काही केल्या ...वर्णिता येत नाही ,
प्रेम-माया त्यातील
काही केल्या ...रक्ताच्या नात्यात नाही ...!!
काही क्षण ...
काही केल्या ...मनातून जात नाहीत ,
एकाकी मनात
काही केल्या ...सताविल्याशिवाय रहात नाहीत ..!!
--- संजय कुलकर्णी .